देऊळ: सर्वव्यापी कलुषित मानसिकतेचं मार्मिक भाष्य

एका घटनेकडे बघण्याच्या अनेकांच्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात पण जर ती घटना दैविक आधाराची असेल तर? या प्रश्नाची ओघवती चर्चा म्हणजे उमेश विनायक कुलकर्णी दिग्दर्शित देऊळ. श्रद्धा – अंधश्रद्धा, विश्वास – अंधविश्वास यांच्यातल्या फरकाची रेषा दाखवणारा हा चित्रपट अनेक वृत्तींचं दर्शन घडवतो. फ्रेडरीख नित्शेची ‘परमेश्वराचा अंत झाला आहे, आपणच त्याला ठार केलं आहे’ ही संकल्पना कुठेतरी कथेत जाणवत राहते.

केश्याला (गिरीश पांडुरंग कुलकर्णी) भर दिवसाच्या झोपेत दिसलेला दत्त कुठे जाऊन पोहोचतो यांच वर्णन चित्रपटात केलेलं आहे. अण्णांची (दिलीप प्रभावळकर) भूमिका खूप संयमी अशी आहे. वैज्ञानिक मानसिकतेच्या अण्णांना देवाच्या नावाखाली चाललेलं विकासाचं राजकारण मान्य नव्हतं. सुधाकर रेड्डी या सिनेमॅटोग्राफरच्या अर्थपूर्ण फ्रेम्स दिग्दर्शकाची दृश्यामानता मांडतात. देऊळ मधल्या पात्रांच्या वेशभूषा कथेचे नवनवीन अर्थ सांगतात. उदाहरणार्थ, वहिनीसाहेबांच्या (सोनाली कुलकर्णी) साड्या आणि एकूण रंगभूषा चित्रपटातल्या एकूण पात्रांच्या वेशभूषेच्या रंगछटांना छेद देणाऱ्या ठरतात. चित्रपटाचं संगीत कथेसारखंच सरळसोट आणि कथेच्या एकूण स्वभावाला साजेसं असं आहे. थोडक्यात, चित्रपट सर्वच पातळ्यांवर यशस्वी ठरलेला आहे. अनेक कलाकार आणि सहकलाकारांचा हा प्रवास मध्यांतरापर्यंत काहीअंशी करमणूकही करतो. मध्यंतरानंतर मात्र दिग्दर्शक कथेचे अनेक कंगोरे आपल्यासमोर मांडतो. केश्याच्या सोबत असणारी करडी (गाय) कथेचा आधारस्तंभ आहे, असं मला वाटतं. केश्या आणि करडी यांच्यामध्ये नकळत असणारी सुसूत्रता कथेचा मूळ गाभा आहे.

भाऊ गलांदेंच्या भूमिकेत असणारे नाना पाटेकर अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेले उथळ राजकारण्याचं चित्रण करतात. नाना पाटेकरांच्या भूमिकेसोबतच किशोर कदम, सुहास शिरसाट, ऋषिकेश जोशी, श्रीकांत यादव, ओम भूतकर, शशांक शेंडे, मयूर खांडगे यांच्या टिपिकल राजकारणी कार्यकर्त्यांच्या भूमिकाही चित्रपटात महत्वाच्या ठरतात.

देऊळ हा जरी विश्वास आणि अंधविश्वास यांच्याबद्दल बोलत असला तरी अण्णांमुळे चित्रपटाला लाभलेली विज्ञानाची किनार चित्रपटाची जमेची बाजू आहे. इथे कुठेच आस्तिकता आणि नास्तिकतेबद्दल उहापोह केलेला दिसत नाही कारण चित्रपटाची मूळ कथा आस्तिकतेमधल्याच स्तोम माजवणाऱ्या मानसिकतेबद्दल बोलते आहे. आपला समाज या जगातली दैवाबद्दलची कोणतीही गोष्ट सांगायची असल्यास स्वतःची वैयक्तिक मालमत्ता असल्यासारखी त्यावर हक्क गाजवून सांगतो. भाऊ गलांदेंच्या भूमिकेला जशी स्वर्थी राजकारण्याची गडद बाजू आहे तशीच गावाचा विकास करण्यासाठी सुद्धा त्यांची तळमळ आहे, पण त्या तळमळीतही त्यांचं विकासाचं राजकारण डोकं वर काढतं. भाऊ गलांदेंच्या भूमिकेला स्वतःचं असं मतच उरलेलं दिसत नाही, इतकं ते सत्तेसाठी लोभी असणारं आहे. एकूणच, देऊळ हा सर्वव्यापी कलुषित मानसिकतेवर मार्मिक भाष्य करणारा चित्रपट ठरतो.

लेखक: अमेय सरदेशमुख


देऊळ नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: