रिंगण: एका संघर्षाची अविरत परिक्रमा

हरवून गेलेलं परत मिळवण्यासाठी चालणारा संघर्ष आणि या संघर्षाच्या चक्रात कळत नकळत येणाऱ्या अनुभवांची मांडणी मकरंद माने लिखित दिग्दर्शित रिंगण या चित्रपटात आपल्याला दिसते. गडद रंगापासून सुरू झालेला कथेचा प्रवास उजेडापर्यंत कसा येऊन पोहोचतो याचं वर्णन इथे केलेलं दिसतं. सामाजिक विषयाचा आधार घेणारी ही कलाकृती नायकाचा व्यक्तिगतरित्या सुरू असणारा परिस्थितीसोबतचा झगडा अतिशय वेधकरित्या मांडते. आपली स्वतःची जमीन कर्जातून मुक्त करण्यासाठी अण्णा (शशांक शेंडे) पैशाची जमवाजमव कशी करतात याचा प्रवास आपल्याला चित्रपटात बघायला मिळतो. अबडु (साहिल जोशी) आणि अण्णा या दोघांची भावविश्व इथे आपल्याला दिसतात. निलेशच्या (अभय महाजन) व्यक्तिरेखेतली परिपक्वता भरकटत जाणाऱ्या बापलेकाच्या प्रवासाचा साक्षीदार ठरते. चित्रपटाची जमेची बाजू असणाऱ्या कथेत अनेक चढ-उतार तर आहेतच पण याच्याही पलिकडे जाऊन दोन भावविश्वांचं एकरूपत्व सुद्धा आहे. प्रयत्नांच्या, मेहनतीच्या या रिंगणात असणारे खाच खळगे प्रामाणिकतेच्या बळावर उभं राहून स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करतात.

रिंगण या चित्रपटाचं वैशिष्ट्य असं की नायकाच्या व्यक्तिरेखेला लाभलेली सामाजिक किनार, ज्यामुळे व्यक्तिरेखेचा संघर्ष अधिक अर्थपूर्ण ठरताना दिसतो. कथेचे अनेक पैलू मांडताना दिग्दर्शकाची दृष्यमानता अतिरंजक आणि गडद होताना दिसत नाही. आत्महत्येच्या गर्तेत न अडकता वास्तवाच्या चटक्यांना सहन करणारे अण्णा रिंगणात असणाऱ्या अमिषाचे बळी देखील पडतात. रिंगणाभोवती सुरू असणारा हा प्रवास खरंतर अविरत जरी असला तरी मूळ कथेच्या धाग्याला हात घालून नायकाच्या प्रवासाला विश्रांती देणारा ठरतो. दिग्दर्शकाची दृश्यामानता ही कथेपूरतीच सीमित राहिलेली नसून कथेच्याही पलिकडे दिसणाऱ्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होते. या अविरत रिंगणाच्या प्रवासाचा आवाका जेवढा मोठा आहे तेवढीच त्याची खोली देखील मोजता न येण्याजोगी आहे. अंधाराच्या मर्यादा ओलांडून येणारा सूर्याचा प्रकाश रिंगणातल्या प्रत्येकाचा साक्षीदार बनतो. अंधाराची किनार लाभलेल्या या सकारात्मकतेच्या रिंगणाला मर्यादांचं जसं भान आहे तशी अमर्यादाची सीमा देखील आहे. जशी जशी कथा शेवटाकडे यायला सुरुवात होते तसे तसे कथेचे चित्रित केलेले अनेक पैलू एकसंध व्हायला सुरुवात होते आणि नायकाची सुरू असलेली रिंगणाभोवतीची परिक्रमा पूर्ण होते.

सुहास शिरसाट आणि कल्याणी मुळे यांच्या भूमिका चित्रपटाच्या कथेच्या दृष्टिकोनातून परिणामकारक आहेत. गंधार संगोराम यांचं पार्श्वसंगीत आणि रोहित नागभीडे यांचं अर्थपूर्ण वाद्यवृंद असणारं संगीत कथेतल्या संघर्षाची आणि शोधाची किनार भक्कम करणारं असं आहे. महेश कोरे यांचं कला दिग्दर्शन त्याचप्रमाणे सोनिया सहस्त्रबुद्धे यांची वेशभूषा चित्रपटाला पूरक अशी बघायला मिळते. अभिजीत आब्दे यांची सिनेमॅटोग्राफी समर्पक प्रतिकांचं चित्रण करते. पंढरपूर सारख्या स्थळामुळे कथेच्या वातावरणाला एक वेगळंच वलय लाभलेलं आहे. कथेची दृश्यमानता दाखवणाऱ्या आब्देंच्या फ्रेम्स चित्रपटात सकारात्मक भूमिका बजावतात.

लेखक: अमेय सरदेशमुख


रिंगण नेटफ्लिक्स वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

4 thoughts on “रिंगण: एका संघर्षाची अविरत परिक्रमा

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: