गंध: मूर्त शक्यतांची सरमिसळ

भौतिक जगात वावरणाऱ्या आपणाला माणसांचे अनेक हावभाव, स्वभाव, अनंत हालचाली बघायला मिळतात. या स्वभावांत, हालचालीत त्या माणसाच्या प्रवासाच्या विविधांगी वाटा सापडतात. पण त्या मूर्त आकृतीला अमूर्ताची खोल जाणीव असेल तर तो मूर्त गोष्टींचे आस्वाद कसे घेईल? मूर्ततेतल्या या अमूर्त जाणिवेबद्दल बोलणाऱ्या सचिन कुंडलकर लिखित दिग्दर्शित ‘गंध’ या चित्रपटात अशा अनेक गोष्टींचे पदर आपल्याला बघायला मिळतात. एक-सलग तीन लघुकथांमधून अनुभूती देणाऱ्या या कलाकृतीत गंधाचे आणि गंध घेणाऱ्या प्रत्येकाचे अनेक पैलू बघायला मिळतात. जन्माला आल्यापासून माणूस सर्वसाधारणपणे तीन अवस्थांमध्ये कार्यरत असतो – कौटुंबिक, वैयक्तिक आणि सामाजिक. या तीन अवस्थांमध्ये असताना प्रत्येक अवस्थेमध्ये येणारे अनुभव मनुष्याच्या संवेदनेची उकल करतात.

वीणाच्या (अमृता सुभाष) लग्नासाठी स्थळे बघताना वीणाचं गोंधळलेपण आणि त्यातून तिला येणारा मंगेशचा (गिरीश कुलकर्णी) सहवास एक सुवास घेऊन येतो यांचं वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसतं. या ‘लग्नाच्या वयाची मुलगी’ कथेतलं हे नाट्य काही अंशी अतिरंजीक जरी असलं तरी मूळ कथेला कुठेच अडसर आलेला जाणवत नाही.

‘औषध घेणारा माणूस’ ही दुसरी कथा सारंग (मिलिंद सोमण) या एचआयव्ही ग्रस्त रुग्णाचा चाललेला औषधांसोबतचा प्रवास मांडते. रावी (सोनाली कुलकर्णी) जेव्हा सारंगला भेटायला येते तेव्हा गंध हरवून बसलेल्या सारंगला रावी कशी बघते, त्या दुर्गंधीचा अडसर त्यांच्या संवादात कशाप्रकारे एक रेषा तयार करते यावरचं भाष्य इथे केलेलं आपल्याला दिसतं.

‘बाजूला बसलेली बाई’ या कथेमध्ये मासिक पाळी असल्यामुळे घरातली कोणतीच कामं न करता येणाऱ्या जानकीची (नीना कुलकर्णी) होणारी घुसमट आणि दुसरीकडे तिच्या वहिनीला होणाऱ्या प्रसूतीवेदना याचं वर्णन इथे आपल्याला दिसतं. या कथेमध्ये व्यक्तिप्रती दाखवण्यात आलेला विरोधाभास गंध या शब्दशः संकल्पनेला छेद देणारा आहे, असं मला वाटतं.

मुख्यतः ‘गंध’ या चित्रपटामध्ये शीर्षकाला अनुसरून असणाऱ्या अनुभवांचं किंवा वेगवेगळ्या दृश्यावकाशाचं चित्रण अत्यंत संयमी मानसिकतेने केलेलं आहे. गंध या शब्दाच्या अनेक बाजू उलगडून दाखवताना त्या कुठे कुठे भडकही जाणवतात. गंध हा दरवळणारा जरी असला तरी या मूळ शब्दालाच शब्दशः पाहिल्याचा प्रत्यय आपल्याला जाणवतो. दृश्यांची ओढाताण न करता संगीताच्या चौकटीत दरवळणारा गंध कृत्रिम तर नाही ना, अशी शंका देऊन जातो. सचिन कुंडलकरांचा ‘गंध’ हा भौतिक जगासोबत जगत असताना राहुन गेलेल्या आणि पुढे येणाऱ्या अनेक प्रसंगाचं चित्रण करतो.

लेखक: अमेय सरदेशमुख


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

3 thoughts on “गंध: मूर्त शक्यतांची सरमिसळ

Add yours

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: