बापजन्म: एका कातरवेळेचा तरल प्रवास

जेव्हा संपूर्ण दिवस संपल्यानंतर संध्येला सांधणारी एक कातरवेळ येते तेव्हा त्या रिक्त क्षणांचं, आयुष्याच्या ‘त्या’ कातरवेळेचं चित्रण म्हणजे निपुण अविनाश धर्माधिकारी लिखित दिग्दर्शित ‘बापजन्म’. अनेक बोलक्या प्रतिकांतून अप्रत्यक्षपणे घडणाऱ्या अनेक घटनांना एका सूत्रात घट्ट बांधताना येणारे शेकडो क्षण या चित्रपटात चित्रित केलेले आपल्याला दिसतात.

एका गुप्तचर यंत्रणेचा अधिकारी असणाऱ्या भास्कर पंडितांना (सचिन खेडेकर) त्यांच्या अखेरच्या टप्प्यात जेव्हा आपल्या विखुरलेल्या कुटुंबाला बघायची ओढ लागते तेव्हा या कथेचा प्रवास सुरू होतो. एक बाप म्हणून भास्कर पंडित स्वतःच्या मुलांना त्यांच्या लहानपणीच्या घरात पाहण्यासाठी काय काय शकला लढवतो, याचं वर्णन या चित्रपटात आहे. अभिजीत अब्देंच्या सूचक आणि नेमक्या फ्रेम्स एक तरल भाव चित्रपटात निर्माण करतात. उत्कृष्ट पटकथा असणाऱ्या या चित्रपटाची जमेची बाजू आहे कलाकारांचा सय्यमी आणि संतुलित अभिनय. सचिन खेडकरांसोबतच वीणा (शर्वरी लोहकरे) आणि विक्रम (सत्यजित पटवर्धन) त्यांच्यापासून दुरावलेल्या मुलांच्या भुमिकेत आपल्याला बघायला मिळतात. अश्या वैविध्यपूर्ण चित्रपटाला असणारं गंधार संगोराम यांचं संगीत पंडितांच्या पूर्वायुष्याबद्दल हळहळ व्यक्त करणारं, त्या अनंत आठवणींना एका विशिष्ट प्रवाहात बांधणारं असं आहे. या संपूर्ण चित्रपटातल्या विनोदाला पंडितांच्या नोकराने म्हणजेच माउलीने (पुष्कराज चिरपुटकर) उत्तम न्याय दिलेला आहे.
मागे म्हणल्याप्रमाणे या चित्रपटात बोलकी प्रतीकं आहे आणि त्यापैकी एक म्हणजे आपटे काका (माधव वझे ). भास्कर पंडितांच्या गोंधळलेपणाची, हरवून गेलेल्याची आपटे काका मात्र कायमसोबत करतात. स्मृतिभ्रंश झालेल्या आपटे काकांचं चित्रपटात वावरणं म्हणजे पंडितांच्या राहून गेलेल्या पूर्वायुष्यातील क्षणांचा आणि वर्तमानात घडणाऱ्या घटनांमध्ये बांधला गेलेला एक सांकव असावा असं आहे. आपटे काकांसोबतच या चित्रपटातलं दुसरं बोलकं प्रतिक म्हणजे पंडितांचा कुत्रा – टायगर. अत्यंत कमी फ्रेम्समध्ये आढळणारा हा टायगर चित्रपटाच्या कथेत नुसता वावरूनच जिवंतपणा आणतो.

‘बापजन्म’ या चित्रपटात अनेक विरोधाभास दाखवले गेलेले आहेत म्हणजे अगदी पात्रांच्या नावांपासून (भास्कर पंडित आणि त्यांची बायको रजनी पंडित) ते चित्रपटातल्या कथेतल्या घडामोडींपर्यंत. भास्कर पंडितांच्या आयुष्याच्या संध्याकाळी येणारा हळवेपणा, एकटेपणा, आणि त्यातून सुरू होणारा ‘रजनीच्या’ आठवणींचा प्रवास निव्वळ विलक्षण वाटावा असाच आहे. चित्रपटाची कथा अतिशयोक्तीपूर्ण घटनांचा, प्रसंगांचा उहापोह करणारी जरी असली तरीसुद्धा त्यात कुठेच ढोंगीपणा किंवा असंबद्धता जाणवत नाही. अशा या ‘ट्रॅमेडी’पटात दिग्दर्शकाने एका नव्या अंगाने बाप आणि मुलांमधल्या नात्यांचा पुनर्जन्म चित्रित केलेला आहे. एकसलग चालू असणारी ही कातरवेळ ‘रजनी’च्या कक्षेतून पहाटेच्या खिडकीवजा आसमंतात केव्हा एक नवा सूर्योदय दाखवते, हे कळतंच नाही.

लेखक: अमेय सरदेशमुख


बापजन्म Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

One thought on “बापजन्म: एका कातरवेळेचा तरल प्रवास

Add yours

  1. बापजन्म या चित्रपटाचे परिक्षण अतिशय उत्तम शब्दबद्ध केले आहे.चित्रपट पहात असताना काही गोष्टी प्रतिकं म्हणून वापरली आहेत हे लक्षात आलं नव्हतं पण तू लिहिलेल्या या प्रशिक्षणातून त्या गोष्टींचा उलगडा झाला.
    खूप छान 👌
    असेच लिहीत रहा

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: