अस्तु: एका आत्मदृष्टीची उद्विग्नावस्था

एका विस्तृत प्रदेशाच्या प्रांगणात होणारा रोजचाच श्वासोच्छ्वासांचा संवाद आणि त्यातूनच माणसांच्या आकृत्यांचे नानाविध आकार निर्माण होतात. या आकारांचा एक बोलपट म्हणजे सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकार दिग्दर्शित ‘अस्तु – so be it’. मनोविकारांबद्दल भाष्य करणारा अस्तु दिग्दर्शकांच्या सय्यमी वृत्तीचं नेमकं चित्रण आहे. समाजभानाच्या दृष्टिकोनातून अस्तु खरंतर थेट भाष्य करत नसून व्यक्तिगत पातळीवरचा संघर्ष, नात्यांच्या मर्यादा या सर्वांना गुंफून एक चित्र तयार करतो. मराठी चित्रपटात या आधी खूप कमी कथांमध्ये अश्या विषयांना अनुसरून चित्रपट केले गेलेले आहेत, परंतु त्या सगळ्यांमधून अस्तु हा वेगळा वाटतो कारण यातल्या प्रत्येक पात्राच्या आत्मदृष्टीला एक उद्विग्नावस्था आहे. आठवणींच्या या विस्तृत पटलावर चालू असणारा हा संवाद काळाच्या अनेक शक्यता निर्माण करू पाहतो.

डिमेन्शिया झालेल्या अप्पांचा (मोहन आगाशे) हा सूर्योदयापासून चालू होणारा प्रवास सुर्योदयालाच संपणारा असा आहे. माणसांच्या असंख्य गर्दीत हरवून गेलेल्या अप्पांमुळे इराची (इरावती हर्षे) होणारी तगमग आणि या भावनांच्या विस्तृतेला लाभलेली माधवाची (मिलिंद सोमण) तटस्थ किनार कथेच्या प्रत्येक अंगाला सामर्थ्याने पेलून धरते. मिलिंद जोग यांचा कॅमेरा अप्पांच्या विस्तृत आकाशाला हळुवारपणे टिपत जातो. मोकळ्या आकाशात वावरताना येणाऱ्या प्रत्येक आवाजाचं, प्रत्येक संवेदनेचं हे तरल चित्रण अप्पांचे नानाविध पदर आपल्याला उलगडून दाखवतात. वेद आणि उपनिषदांचा सखोल अभ्यास असणाऱ्या अप्पांच्या मुखोद्गत संस्कृत ओव्या आणि झेन तत्वज्ञानातील काही वचनं चित्रपटाचा वैचारिक कोपरा स्पष्ट करतो. अंत्या (नचिकेत पूर्णपात्रे) आणि चन्नामासोबत (अमृता सुभाष) असणारा हत्ती अप्पांचं विस्तीर्ण अवकाश सतत जाणवून देत राहतो.

अस्तु हा चित्रपट फक्त मनोविकार लोकांची व्यथा मांडणारा शोकपट नसून झेनच्या विश्वाची कथा सांगणारा आणि शून्यतेच्या शून्याला हात घालणारा असा आहे. उपनिषदांच्या महावाक्यांपैकी एक असं “अहं ब्रह्मास्मि” हे वचन भावे आणि सुकथनकारांच्या अस्तुमध्ये वेळोवेळी आपल्याला दिसतं. चूक-बरोबर, खरं-खोटं, सत्य-असत्य, लौकिक-अलौकिक, द्वैत-अद्वैत या सर्वांच्या पलिकडे जाऊन अस्तुच्या वर्तमानाचे सर्व आयाम गळून पडतात आणि उरतो तो फक्त ‘मी’ – ना माझ्यासारखं, ना माझं. अस्तुच्या पटकथेमध्ये इराचा ना नुसताच मानसिक कल्लोळ आहे ना अप्पांच्या तत्वज्ञानाचा भडिमार आहे तर या सर्वांचं संमिश्र असं सुंदर भावचित्र इथे आहे. हत्तीची विशालता टिपणारं आणि अप्पांमधलं लहान मूल जपणारी ही नाळ समुद्रासारखी अथांग अशी आहे.

लेखक: अमेय सरदेशमुख


अस्तु Amazon Prime Video वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

2 thoughts on “अस्तु: एका आत्मदृष्टीची उद्विग्नावस्था

Add yours

  1. अतिशय भावपूर्ण असणारा चित्रपट आणि त्यावर तू केलेलं परिक्षण खूपच भावलं मनाला..

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: