देवराई: हिरव्यागार जंगलातली शिशिराची पडझड

मुसळधार पावसात मनसोक्त भिजून झाल्यानंतर शरदाचं चांदणं बघताना शिशीराची पानझड झाली तर कसं गोंधळायला होईल! अगदी तश्याच ‘केयोस’चं चित्रण आपल्याला सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर दिग्दर्शित ‘देवराई’ या चित्रपटात पाहायला मिळतं. हिरव्या कुंचल्याच्या सोबतीचा हा प्रवास दुःखाची प्रखर छाया प्रत्यक्षपणे मांडत नसला तरी मनाच्या असंख्य गुंत्याचे पदर उलगडून दाखवण्यासाठी हा चित्रपट प्रभावी ठरतो. स्क्रीझोफ्रेनिया या मनोरुग्णाच्या चष्म्यातून दाखवलेला हा प्रवास खरंतर अखंड आणि न संपणारा असा आहे. वास्तविक जगापेक्षा स्वतंत्र जगाचं अस्तित्व पाहणाऱ्यांचा हा प्रवास संवेदनेची कास धरणारा आणि भावनांच्या अचल पटलावरचा एक ठळक बिंदू ठरावा असा ठरतो.

शेष (अतुल कुलकर्णी) या मनोरुग्णाच्या जगात देवराईबद्दल, देवराईच्या जंगलाबद्दल, त्याबद्दलच्या विश्वास-अंधविश्वासाबद्दल खूप जिज्ञासा असते. या जिज्ञासेपोटी त्याचं चालू असलेलं संशोधन काही कारणास्तव अपूर्ण राहतं. या अपूर्णतेच्या त्याच्या जगात मात्र सीना (सोनाली कुलकर्णी) ही त्याची बहीण त्याचा हात कधीच सोडत नाही. स्क्रीझोफ्रेनियाच्या या देवराईत आपली वाट हरवून बसलेला शेष मनोविकारतज्ञासोबत (डॉ. मोहन आगाशे) आपली हरवलेली वाट गवसण्याचा प्रयत्न करतो आहे. कल्याणीसोबत (देविका दफ्तरदार) असणारं त्याचं नातं उलगडायच्या आधीच कोमेजून जातं. अश्या नानाविध संवेदनांना एका प्रवाहात मांडणाऱ्या सिनेमॅटोग्राफर देबू देवधर यांच्या फ्रेम्स देवराईच्या प्रत्येक कोड्याची उकल करतात.A Beautiful Mind (२००१) या इंग्रजी सिनेमात जॉन नॅश या स्क्रीझोफ्रेनियाग्रस्त गणिततज्ञाचा चरित्रपट मांडलेला आहे. देवराई या सिनेमात एका काल्पनिक कथेला लाभलेली वैज्ञानिक गुंफण आहे. देवराई हा वैयक्तिक संघर्षाबद्दल जरी भाष्य करत असला तरी कुठेतरी माहितीपटाचं स्वरूपसुद्धा लाभलेलं आपल्याला दिसतं. याउलट, A Beautiful Mind मध्ये असणारा प्रत्येक प्रसंग हा व्यक्तिगत स्वरूपाचा व्यक्तिनिष्ठ असा होता. अर्थात, या दोन्ही चित्रपटामध्ये असणारा पटकथेचा वेगळेपणा, दिग्दर्शकाचं दृश्यमान यांसारख्या गोष्टी भिन्न असल्या तरी देवराई हा स्क्रीझोफ्रेनिया या आजाराच्या उपचाराभोवती फिरणारा असा चित्रपट आहे तर A Beautiful Mind या चित्रपटात स्क्रीझोफ्रेनिया या आजाराभोवतालचं चित्रण आहे.

आकारांच्या या असंख्य अचल पटलावर गोंधळलेल्या बिंदूच्या अमर्याद वाटा जेव्हा दिसतात तेव्हा त्या प्रत्येक रस्त्यावरच्या प्रत्येकाचं सुसूत्रता लाभलेलं स्वतःचं असं हे जग असतं. या अखंड माणसांच्या प्रवाहात प्रवाहापासून वेगळी झालेली काही माणसं असतात. देवराईच्या या जंगलात आलेले अनेक आवाज, अनुभूतीस आलेल्या प्रत्येक हालचाली, शेषासोबतच सीनाची होणारी तगमग यांची संय्यमित दृश्यभाषा आपल्याला पाहायला मिळते. एका संवेदनशील विषयावर बेतलेला हा चित्रपट काही अंशी संथ जरी वाटत असला तरी तो संथपणा कुठेच खटकत नाही असं वाटतं. एकूणच देवराईतल्या या संशोधनाचा प्रवास शिशिराच्या पानझडीत गुरफटलेला नसून हिरव्यागार जंगलाची किनार लाभलेला असा आहे.

लेखक: अमेय सरदेशमुखदेवराई Amazon Prime Video आणि Netflix वर उपलब्ध आहे.


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

One thought on “देवराई: हिरव्यागार जंगलातली शिशिराची पडझड

Add yours

  1. खूपच छान समीक्षा केली आहे.तुझं समीक्षा लेखन हे परिपूर्ण वाटतं,कारण तू सगळे मुद्दे तुझ्या लेखनात समाविष्ट करतोस..
    असेच लिहीत रहा

    Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: