मेघे धाका तारा: अव्यक्त बोलकेपण

निरभ्र आकाशातून प्रवास करताना अनवट वळणाला लाभलेला आभाळाचा सहवास पटकथा लेखक आणि दिग्दर्शक ऋत्विक घटक यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे. बंगालच्या फाळणीवर अप्रत्यक्षपणे भाष्य करताना दिग्दर्शकाने त्यावेळेसच्या लोकजीवनावर तश्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीचा कसा परिणाम झाला होता, याचं वर्णन देखील केले आहे. शक्तीपादा राजगुरू यांच्या मेघे धाका तारा या सामाजिक विषयपर कादंबरीवर आधारित हा ऋत्विक घटक यांच्या फाळणीवर बेतलेल्या तीन चित्रपटांच्या मालिकेतील महत्त्वाचा चित्रपट मानला जातो.

घराचा आर्थिक भार सांभाळणाऱ्या नीताला (सुप्रिया चौधरी) कुटुंबासाठी स्वतःचा त्याग करावा लागतो. तिचा कृतिशून्य सख्खा भाऊ शंकर (अनिल चॅटर्जी) घराची कोणतीच जबाबदारी न उचलता संगीताची आवड असलेला असा बेकार तरुण आहे. तिचा हा स्वतःच्या कुटुंबासाठी होणारा त्याग कुटुंबाकडून कसल्याच स्तुतीची देखील अपेक्षा ठेवीत नसतो. अश्या निस्वार्थी व्यक्तीच्या वाट्याला आलेल्या संघर्षाचं चित्रण आपल्याला या चित्रपटात दिसतं. ऋत्विक घटक यांची पटकथेची मांडणी चित्रपटात सर्वाधिक परिणामकारक ठरते. यांसोबतच नीताच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक भावनेला लाभलेली दिनेन गुप्ता यांच्या कॅमेऱ्याची फ्रेम अगदी विलक्षण असावी अशी आहे. जशी चित्रपटाची पटकथा आणि दिग्दर्शकीय कौशल्य चित्रपटात जास्त परिणामकारक ठरतं त्याचप्रमाणे चित्रपटला लाभलेलं रवी चॅटर्जी यांचं कलादिग्दर्शन कथेतल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीचा सुयोग्य दृश्यपरिणाम दर्शवतं. या सर्वांसोबतच चित्रपटात असणारं वेगवेगळ्या रागावर आधारित शास्त्रीय संगीत दृश्यमानाच्या बहुआयामी परिणामात अधिक बहार आणतं.घटक यांच्या चित्रपटाला दुःखाची किनार लाभलेली आपल्याला दिसते. एका संपूर्ण आकारमानाची अपूर्ण सावली लाभलेली नीता कथेचा तुटता किनारा असावा तशी आहे. या अधुरी कहाणीतल्या भातुकल्या अगदी पूर्णतः निर्जीव नसल्या तरी मूर्त जगात वावरणाऱ्या आहेत. घटक यांच्या मूर्त अवस्थेतल्या नीताचा त्यागाचा अव्यक्त पदर अखेर क्षयरोगाच्या तीक्ष्ण खिळ्यात अडकून फाटतो.

मेघे धाका तारा हा एका स्त्रीचा त्याग दाखवणारा जरी असला तरी त्यात कुठेच स्त्रीवादी भूमिका डोकावताना आपल्याला दिसत नाही. याउलट, हा चित्रपट एक ‘सबलाईम एकपिरियन्स’ असावा असा आहे. घटक यांच्या या चित्रपटात असणारी अर्थपूर्ण प्रतीकं अव्यक्त संवादाची बोलकी माणसं असावीत तशी आहेत. या प्रतीकांचा चित्रपटातला मुख्य वावर म्हणजे कथेत असणाऱ्या परिस्थितीवरचं मार्मिक भाष्य. या चित्रपटातला नीताचा संघर्ष कुठेच लालभडक आणि अतिरंजक नसून वास्तवाच्या अनेक छटा मांडून शेवटी आपल्याला परिस्थितीसोबत एकरूप होण्याचं आवाहन करणारा आहे. अश्या प्रकारे मेघे धाका तारा हा वास्तववादी शैलीतला अव्यक्त स्वभावातील बोलकी शांतता दाखवणारा अनुभव आहे.

लेखक: अमेय सरदेशमुख


Copyright ©2018 Cinema Paradise. This article may not be reproduced in its entirety without permission. A link to this URL, instead, would be appreciated.

Advertisements

One thought on “मेघे धाका तारा: अव्यक्त बोलकेपण

Add yours

  1. खूप छान लिहिलंय. समीक्षण करताना कथेचं सूत्र अगदी मोजक्या शब्दांत मांडलं आहे, परंतु अजून सविस्तर लिहिल्यास अधिक चांगलं वाटेल..

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Powered by WordPress.com.

Up ↑

%d bloggers like this: